अहिल्यानगर | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहिल्यानगर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 82 रिक्त जागा भरण्यात (Shri Saibaba Sansthan Bharti 2024) येणार आहेत. या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार सदर रिक्त पदांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचे आहेत.
या भरती अंतर्गत न्युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोसर्जन, यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, सीनियर ऍनेस्थिसिओलॉजिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, .
वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ , बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट,
अपघाती वैद्यकीय अधिकारी, R.M.O, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट), अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Shri Saibaba Sansthan Bharti 2024
सदर रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर ४२३१०९
PDF जाहिरात – Shri Saibaba Sansthan Vacancy 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
टिप्पणी पोस्ट करा