Top News

Kusum solar system कुसुम सोलार योजनेत तुमचा अर्ज पात्र कि अपात्र चेक करा...

 




Kusum solar system कुसुम सोलार योजनेत तुमचा अर्ज पात्र कि अपात्र चेक करा...

Kusum solar system; कुसुम सोलार योजनेतून मिळणाऱ्या सोलार पंपाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज केला आहे का? तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र हे तुम्हाला ऑनलाईन कसे चेक करावे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 



अनेकदा शेतकऱ्यांना फसवे मेसेज येतात आणि या फसव्या मेसेज वर पेमेंट केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होते तरी फसवे मेसेज कसे ओळखावे याबाबत सविस्तर माहिती पाहुया..



शेतकरी मित्रांनो अपला अर्ज सोलार पंपासाठी पात्र आहे का अपात्र कसे चेक करावे हे step by step पहा

1. सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या महाऊर्जाच्या संकेतस्थळावर भेट द्या.




2. होमपेजवर "लॉगिन" बटणावर क्लिक करा.

3. तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

 4. लॉगिन झाल्यानंतर "आवेदनाची स्थिती" हे पर्याय निवडा.



5. तुमच्या अर्जाची स्थिती समोर दिसेल.

6. जर तुमचा अर्ज "प्राप्त" असे दर्शवत असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे.

7. जर तुमचा अर्ज “नाकारलेला" असे दर्शवत असेल तर तुमचा अर्ज अपात्र आहे.





तुमचा अर्ज अपात्र असल्यास त्याचे कारण समजून घेण्यासाठी तुम्ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच सोलार पंप योजनेत फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा....

1) मोबाईलवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.




2) कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाइटवरून तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.

3) जवळच्या महावितरण कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या.




 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने