Axis Bank Personal Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात पर्सनल लोन घेण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी पूर्ण नक्की वाचा. विशेषता ज्यांना ॲक्सिस बँक या प्रायव्हेट सेक्टरमधील बड्या बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल त्यांनी नक्कीच ही बातमी वाचली पाहिजे.
कारण की, आज आपण ॲक्सिस बँकेच्या पर्सनल लोनची माहिती पाहणार आहोत. पर्सनल लोन साठी ॲक्सिस बँक ग्राहकांकडून किती व्याज वसूल करते, दहा लाखांचे पर्सनल लोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरंतर, पर्सनल लोनचे अर्थातच वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जाच्या तुलनेत अधिक असतात. कारण की, वैयक्तिक कर्ज हा असुरक्षित कर्ज प्रकार आहे. यामुळे बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर लावले जाते.
हेच कारण आहे की, जाणकार लोक जेव्हा पैशांची खूपच इमर्जन्सी असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज काढावे अन्यथा इतर पर्यायी मार्गाने पैशांची उपलब्धता करावी असे आवाहन करतात. तथापि, जर तुम्ही ॲक्सिस बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर आज आपण यासंदर्भात महत्वाची माहिती पाहणार आहोत.
ॲक्सिस बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार, ॲक्सिस बँक 10.75% ते 22 टक्के या व्याजदरात आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर हे सर्वच ग्राहकांच्या सिबिल स्कोरवर अवलंबून असते. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून किमान व्याज दरात कर्ज दिले जाऊ शकते.
आठशेच्या आसपास सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना किमान 10.75 टक्के या इंटरेस्ट रेटवर वैयक्तिक कर्ज मिळणार आहे. जर समजा एखाद्या ग्राहकाला ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून 10.75 टक्के या इंटरेस्ट रेटवर 3 वर्षांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 32,620 रुपयाचा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला 11 लाख 74 हजार 320 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच सदर ग्राहकाला एक लाख 74 हजार 320 रुपये व्याज स्वरूपात अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा