मुंबई : बँकेशी संबंधीत जर तुमची काही काम असतील तर ती तुम्ही आजच नियोजन करा. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. याचं कारण म्हणजे या आठवड्यात तीन दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन अगदी पक्क करायला हवं.
RBI कडून प्रत्येक महिन्याच्या सुट्टी जारी केल्या जातात. 12 ते 18 तारखेच्या आठवड्यात एकूण तीन दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे ATM सेवेवरही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
चेकचं काम, मोठे व्यवहार, KYC किंवा इतर कोणत्याही छोट्या मोठ्या कामासाठी बँकेत जाण्याचा विचार असेल तर तुम्ही या तीन दिवसांत करून घ्या. कारण तीन दिवस सुट्टी असणार आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशभरातील सगळ्या बँकांना सुट्टी आहे. 18 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. 17 ऑगस्ट रोजी शनिवार आणि त्यासोबत मोहरम आल्याने काही राज्यातील बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.
17 ऑगस्ट रोजी मोहरमच्या निमित्ताने आंध्र प्रदेश, मिझोराम, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, अंदमान निकोबार, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील बँका बंद राहणार आहेत.
सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करणं किंवा छोटी कामं ही ऑनलाईन बँकेच्या साईटवरुन अथवा अॅपच्या मदतीनं ऑनलाईन पद्धतीनं करु शकता. मात्र चेक किंवा इतर कामांसाठी तुम्हाला नियोजनच करावं लागेल.
तीन दिवस सुट्टी असल्याने ATM मध्ये पैशांचा खडखडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच थोडे पैसे काढून हाताशी ठेवा. नाहीतर आयत्यावेळी पैसे काढण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा