BMC Recruitment 2024 विद्यार्थी मित्रांसाठी खुशखबर आहे कारण की, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठीची अधिकृत जाहिरात तुम्हाला सर्वात खाली दिलेल्या लिंक मध्ये पाहायला मिळणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील वेगवेगळ्या खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील “कार्यकारी सहाय्यक” पदांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात 20 ऑगस्ट पासून सुरू झालेली असून शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे. टोटल रिक्त जागा – १८४६पदांचे नाव – “कार्यकारी सहाय्यक” अर्थात लिपिक पदांसाठी ही भरती आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असायला हवे.
या व्यतिरिक्त उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, कला, विज्ञान किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नांमध्ये कमीत कमी 45% गुणांसह पास असावे.
उमेदवारांकडे शासनाचे इंग्रजी आणि मराठी टायपिंगचे प्रत्येकी कमीत कमी 30 शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे.
वयोमर्यादा – अर्ज करायचा असल्यास तुमचे वय 18 ते 43 वर्षांच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क – ओपन कास्ट उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 1000 रुपये राहणार आहे. तसेच मागासवर्गांमधील उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकारन्यात येईल.
पगार किती मिळेल – २५,५०० ते ८१,१००
ऑनलाईन अर्ज 👉 इथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात 👉 इथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा