Sangli News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी एक गुंठा जागा खरेदी अनुदान व १०० परसातील कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सांगली जिल्ह्यामधून भटक्या जमाती (क) प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची मुदत २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी दिली. सांगली जिल्ह्यामधून पात्र लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करता येतील.
अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्हा आणि तालुक्याचे लक्ष्यांक पाहून निर्धारित केलेल्या वेळेनुसारच योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत राहणार आहे. या योजनेमधील अर्जदारांची प्रतीक्षाधिन यादी पुढील ५ वर्षे ग्राह्य धरली जाणार आहे.
सांकेतिक स्थळ आणि मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे योजनांचा लाभ येता येईल. अनुदानाची मर्यादा उपघटकनिहाय ५० टक्के ते ७५ टक्क्यांच्या मर्यादेत देय राहिल, असे डॉ. थोरे यांनी सांगितले आहे.
योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी https://www.mahamesh.org/ या वेबसाइटचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा