Top News

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करा ? या नागरिकांना मिळणार मोठा लाभ, फायदे काय? जाणून घ्या.! (Ration card online apply)





 Ration card online apply : दैनंदिन जीवनासाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे दस्तावेज आहे. ज्या व्यक्तीकडे रेशन कार्ड आहे अशा व्यक्तींना सरकारकडून धान्य स्वरूपात वेगवेगळ्या योजना प्राप्त करून दिल्या जातात. यामध्ये नागरिकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्नशासनाद्वारे शासनाकडून प्राप्त करून दिले जाते. तुम्ही सुद्धा महाराष्ट्र मध्ये राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड उपलब्ध नसेल तर तुम्ही आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड बनवू शकता. याकरता तुम्हाला काय करावे लागेल याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.


सर्वप्रथम रेशन कार्ड चे प्रकार बघा (Ration card online apply)

पिवळे रेशन कार्ड :- हे रेशन कार्ड दारिद्र रेषेखालील कुटुंब यांना देण्यात येते या रेशन काढला बीपीएल कार्ड सुद्धा म्हटले जाते

केशरी रेशन कार्ड :- ज्या नागरिकांचे पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक व एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न आहे अशा नागरिकांना हे केशरी रेशन कार्ड दिले जाते.

पांढरे रेशन कार्ड :- एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना हे पांढरे रेशन कार्ड दिले जाते

Ration card online apply

रेशन कार्ड बनवण्याकरता पात्रता (Ration card online apply)

रेशन कार्ड बनवण्याकरता अर्जदार व्यक्तीकडे महाराष्ट्रातील किंवा इतर कुठल्याही राज्यातील रेशन कार्ड नसावे

अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे

अर्जदार व्यक्ती रेशन कार्ड साठी अर्ज करण्याकरता महाराष्ट्र सरकारने ठरवून देण्यात आलेल्या उत्पन्न अंतर्गत पात्रता पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

रेशन कार्ड बनवण्याकरता आवश्यक कागदपत्रे (Ration card online apply)

अर्जदार व्यक्तीच्या आधार कार्ड

पॅन कार्ड

उत्पन्नाचा दाखला

वीज बिल

घर भाड्याची पावती

अर्जदार व्यक्तीचे बँक पासबुक

अर्जदार व्यक्तीचा फोटो

रेशन कार्ड काढण्याचे फायदे (Ration card online apply)

तुम्ही जर रेशन कार्ड काढले तर तुम्हाला अनेक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येते

प्रत्येक नागरिकाचे रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र म्हणून महत्त्वाचा दस्तावेज आहे.

पॅन कार्ड करता अर्ज करत असताना हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरण्यात येतो

तुम्हाला जर नवीन एलपीजी कनेक्शन घ्यायचे असेल तर त्याकरता रेशन कार्ड आवश्यक आहे

रेशन कार्ड वापर हा बँक खाते उघडण्याकरता आणि बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याकरता सुद्धा केला जाऊ शकतो.

नवीन मतदार ओळखपत्र बनवण्याकरता तसेच ड्रायव्हिंग लायसन्स व इतर आवश्यक कागदपत्रे काढण्याकरता सुद्धा रेशन कार्डचा वापर केला जातो.

रेशन कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा? (Ration card online apply)

ज्या व्यक्तीला रेशन कार्ड बनवायचे आहे त्याने सर्वात अगोदर सरकारच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे

त्या ठिकाणी तुम्हाला साइन इन किंवा रजिस्टर या पर्यावरण क्लिक करून घ्यायचा आहे

ल त्यानंतर पब्लिक लॉगिन या पर्यावर क्लिक करायचे आहे

यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगिन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून द्यायचे आहे

नंतर तुम्हाला new user sign up here अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे

आता तुम्हाला नवीन रेशन कार्ड साठी want to apply for new ration card या पर्यायावर क्लिक करून द्यायचे आहे

आता तुम्हाला स्क्रीनवर मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून यानंतर तुमचा युजर आयडी व पासवर्ड तयार करा (Ration card online apply)

यानंतर register user जोक्स वरती क्लिक करून आपली युजर आयडी तसेच पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड व्यवस्थित भरून gate OTP या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे

यानंतर OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे

अशाप्रकारे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय अन्नसुरक्षा कार्यक्रमाच्या वेबसाईटवर तुमचे अकाउंट ओपन होईल.

तुमच्या अकाउंट उघडल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन वर जाऊन रजिस्टर युजर या ऑप्शन वरती क्लिक करून पुन्हा लॉगिन पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचे आहे

आता या ठिकाणी तुम्हाला एप्लीकेशन रिक्वेस्ट मध्ये apply for new ration Card या पर्यावरणातील क्लिक करून तिथे मागितलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून द्यायचे आहे

त्यानंतर submit for payment या पर्यायावर क्लिक करून शुल्क भरून घ्यायचा आहे

ऑनलाइन फी जमा झाल्यानंतर तुमची माहिती पडताळणी करतात तहसील कार्यालय मध्ये अधिकाऱ्याकडे पोहोचवली जाईल. तुम्ही रेशन साठी पात्र असाल तर तुम्हाला तुमची रेशन कार्ड मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने