Top News

महावितरणमध्ये 5347 पदांसाठी महाभरती, दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी, शेवटची संधी, लगेचच करा अर्ज

 




मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 



या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. मग उशीर कशाला करता खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत.




ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरण विभागाकडून राबवली जातंय. विद्युत सहाय्यक ही पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला तंत्रज्ञ या पदावर थेट घेतले जाणार आहे.



ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.



  अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास आणि आयटीआय पास असणे आवश्यक आहे. 18 ते 29 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.



या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा ही द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला www. mahadiscom.in या साईटवर मिळेल. याच साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.




या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. 250 रूपये फीस ही उमेदवारांना द्यावी लागेल. 


यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सूट देण्यात आलीये. महावितरणमध्ये नोकरी करण्याची थेट संधी ही तुमच्याकडे आहे, चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने