बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना लग्नासाठी मिळणार ३० हजार रुपये आर्थिकसहाय्य. बघा कसा घ्यायचा या योजेचा लाभ. कोठे करायचा अर्ज कोणते कागदपत्रे आहे आवश्यक ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून सक्रीय असायला हवी तरच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्याला मिळणार आहे. जर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. नोंदणी कशी करायची ही महिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे राबविली जाते. या मंडळातर्फे नोंदणीकृत लाभार्थ्यांना एकूण ३२ योजनांचा लाभ दिला जातो त्यापैकीच ही एक योजना आहे.
ही योजना राबविण्यामागचा उद्देश म्हणजेच कामगारांना आर्थिक सहाय्य देणे आहे. बऱ्याच बांधकाम कामगारांची परिस्थिती खराब असते त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा बघा खालीलप्रमाणे.
लग्नासाठी मिळणार ३० हजार महत्वाचे कागदपत्रे
हा अर्ज तुम्हाला pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर लेखाच्या शेवटी अर्ज डाऊनलोड करा असे बटन आहे त्यावर क्लिक करा आणि अर्ज डाऊनलोड करा. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे महत्त्वाचे आहे बघा खालीलप्रमाणे.
लाभार्थी कुठला रहिवासी आहे याचे प्रमाणपत्र.
अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र.
इमेल id.
लाभार्थ्याने ९० दिवस काम केले आहे याचे प्रमाणपत्र.
पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड चालेल)
ही रक्कम फक्त पहिली लग्नासाठी मिळणार आहे त्यामुळे पहिल्या लग्नाचा पुरावा लागणार आहे.
अर्जदाराचा जन्म दाखला.
पासबुक प्रत.
लाभार्ती बांधकाम कामगार आहे याचे प्रमाणपत्र (ग्राम पंचायततर्फे)
छायाचित्र (पासपोर्ट स्वरुपात ३ नग)
मोबाईल क्रमांक.
असा करा अर्ज
खाली तुम्हाला जा अर्ज मिळेल.
या अर्जामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे बघा खालीलप्रमाणे.
लाभार्थ्याचे संपूर्ण नाव.
रजिस्टर कमांक.
तारीख.
जन्म तारीख आणि लाभार्थ्याची वय.
लाभार्थ्याच्या बँकेचे नाव.
IFSC क्रमांक.
आता लाभार्थ्याला कागदपत्रांची माहिती विचारल्या जाईल ती योग्य प्रकारे भरा.
अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करून सादर करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा