Farmer's Scheme Updates: मागील वर्षीच्या खरीप हंगामात (२०२३) कपाशी आणि सोयाबीन पीक लागवड केलेल्या आणि ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु ही मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करून घ्यावी लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना १ हजार, तर दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे यासाठी शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीनच्या लागवडीनंतर ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली हवी. तशी नोंद नसेल तर तलाठ्यांकडून सातबारा उताराऱ्यावर या पिकाच्या लागवडीची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद करताना आधार क्रमांकाची पोर्टलवर माहिती भरलेल्या खात्यावर ही मदत मिळणार आहे. अनेकदा शेतकऱ्यांची सामायिक खातेदार असतात.
सामायिक खातेधारकांनी इतर खातेधारकांची संमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करतील, अशा खात्यावर ही मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी मात्र वैयक्तिक आणि सामयिक खातेदार यांची प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे करावी लागणार आहे.
अशी करा ई-केवासयी ई-केवायसी करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी सहायकाशी संपर्क करावा. कृषी सहायक त्यांच्या लॉगिनमधून शेतकरी खातेदाराच्या आधारला जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवून ई- केवासयी करून घेतील. दुसरी पद्धत ऑनलाइन स्वरूपाची आहे. त्यासाठी https //scagridbt.mahait. org/ या संकेतस्थळावर जावे. मुख्य पानावर Disbursement Status येथे क्लिक करून तिथे शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. त्यानंतर ओटीपी टाकून ई-केवायसी पूर्ण करावी.
टिप्पणी पोस्ट करा