Top News

खुशखबर! GST विभागात नवीन 522 पदांची होणार भरती | MahaGST Vibhag Bharti 2024




  मुंबई | वस्तू आणि सेवा कर विभागात नवीन 522 पदांची लवकरच भरती (MahaGST Vibhag Bharti 2024) केली जाणार आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली.


  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच वस्तू कर व सेवा कर विभागाच्या 12 हजार 259 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील मान्यता देण्यात आली.


नवीन पदांमध्ये 9 पदे अपर राज्य कर आयुक्त, 30 राज्य कर सह आयुक्त, 36 राज्य कर उपायुक्त, 143 सहायक राज्य कर आयुक्त, 275 राज्य कर अधिकारी, 27 राज्य कर निरिक्षक आणि 2 स्वीय सहायक लघुलेखक गट-अ अशा पदांचा समावेश आहे.



MahaGST Vibhag Bharti 2024

राज्याच्या कर संकलनाचा हिस्सा देशाच्या 15 टक्के आहे. तसेच महसुलामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. राज्याच्या एकूण महसुलात जीएसटीचा हिस्सा 68 टक्के असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज भासत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने