Top News

अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2024 | मासिक वेतन - 35,400 ते 1,12,400 रूपये | ऑनलाईन अर्ज सुरू | Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024

 



Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा भरती करीता फक्त पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी 11.00 वाजले पासून ते दि. 03 नोव्हेंबर 2024 रात्री 23.55 या. पर्यंत या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील गट- क संवर्गातील मुख्यसेविका यांची 102 पदे भरण्यांत येणार आहेत. या भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन 35,400 ते 1,12,400 रूपये दिले जाणार आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.



भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ■ भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. ■ भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत ही पदे भरली जात आहेत. ■ पदाचे नाव : अंगणवाडी मुख्यसेविका / अंगणवाडी सुपरवाइझर / पर्यवेक्षिका. ■ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण उमेदवार. ■ मासिक वेतन : 35,400 ते 1,12,400 रूपये. ■ उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ■ अंगणवाडी मुख्यसेविका भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.


 PDF जाहिरात ऑनलाईन  येथे क्लीक करा 

  अर्ज      येथे क्लीक करा


■ अर्ज सुरू : दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. ■ अर्ज स्विकारण्याची पद्धती: ऑनलाईन प्रणाली व्दारे हे अर्ज भरले जात आहेत. • वयोमर्यादा : 21 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मागासवर्गीय व इतर उमेदवारांना शिथिलता) ■ भरती कालावधी: कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. ■ अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग - 1000 रूपये, मागासवर्गीय - 900 रूपये. ■ एकूण पदे : या भरती मध्ये 102 पदे भरली जात आहेत. ■ मुख्यसेविका या पदांसाठी परिक्षा नियमावली नुसार सर्व पात्र उमेव्दारांची लेखी परिक्षा एकाच वेळी घेण्यात येईल. या करिता एकूण 200 गुणांचे वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective) पेपर असेल व प्रत्येक प्रश्नास दोन गूण असतील. ■ नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Government Job in Maharashtra) ■ मुख्यसेविका कर्तव्य व जबाबदाऱ्या : 1] अंगणवाडी सेविकांच्या कामाचे पर्यवेक्षिकां कडून पर्यवेक्षण करणे, नागरी भागातील 25 अंगणवाड्यांसाठी एक मुख्यविका पर्यवेक्षि का असेल तसेच तिच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतील. अ-पर्यवेक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकांसह अंगणवाड्यांचा कार्यक्रम आखतील. ब-अंगणवाडी सेविकांना क्षत्रीय समस्या निवारण करणे.


क-कुटुंबांची यादी तयार करणे, लोकसंख्येचे लक्ष्य गट ओळखणे यासाठी मदत आणि मार्गदर्शन करेल. ड-सर्व जन्म आणि मृत्यूच्या नोंदी अद्ययावत ठेवणे. 2] वेळोवेळी अंगणवाडीतील सर्व नोंदी, रजिस्टर्स, रोख आणि खाती, साठा आणि साहित्य तपासेल आणि अंगणवाडी सेविकांना या संदर्भात आवश्यक सूचना आणि सूचना देईल आणि अंगणवाडी सेविकांकडून मासिक प्रगती अहवाल नियमितपणे सादर करण्याची खात्री करेल. 3] अंगणवाडी सेविका आणि CDPO तसेच अंगणवाडी सेविका आणि PHC कर्मचारी, विशेषतः L.HVs यांच्यात संपर्क व संमन्वय करणे. 4] व इतर कर्तव्य व जबाबदाऱ्या. ■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे. ASUS Exclusive Store - Darshan Electronics ■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने