Top News

Kusum Solar Payment: "या" शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप साठी पेमेंट ऑप्शन आले | असे चेक करा?

 




शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंप Kusum Solar Payment उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना ही राज्यात मागील 4 वर्षापासून राबविण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडून मागवण्यात आलेल्या अर्जा मधून त्रुटि पूर्तता करून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना महाऊर्जा विभागामार्फत सेल्फ सर्वे आणि रक्कम भरणा करण्यासाठी संदेश पाठविण्यात आलेले आहेत.


या शेतकऱ्यांना येत आहे पेमेंट ऑप्शन (Kusum Solar Payment)

राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून शेतकरी हे कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. आणि या अर्जमधून जिल्हयानिहाय कोटा उपलब्ध झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना सोलर पंप उपलब्ध करून दिला जात आहे. तर, आता, सन 2021-22 मध्ये सादर केलेल्या अर्ज मधून त्रुटि पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना महाऊर्जा विभागामार्फत सेल्फ सर्वे आणि रक्कम भरणा करण्यासाठी संदेश पाठविण्यात आलेले आहेत. (Kusum Solar Payment)


तर, ज्या शेतकऱ्यांना असे संदेश प्राप्त झाले आहेत त्यांनी महाऊर्जा विभागाचे अधिकृत अॅप्लिकेशन हे इंस्टॉल करून त्यामध्ये आपला नोंदणी MK आयडी टाकून लॉगिन व्हावे आणि आपला सेल्फ सर्वे पूर्ण करून घ्यावा. त्यानंतर आपल्या लॉगिन मध्ये पेमेंट करण्या साठी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल त्या ठिकाणी पेमेंट करावे. Kusum Solar Payment

असे चेक करा ?

जर, आपल्याला संदेश आला नसेल तर आपण महाऊर्जा विभागाचे अधिकृत अॅप्लिकेशन हे इंस्टॉल करून त्यामध्ये आपला नोंदणी MK आयडी टाकून लॉगिन व्हावे आणि त्या ठिकाणी सेल्फ सर्वे हा ऑप्शन आला आहे की नाही हे पहावे. Kusum Solar Payment

कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक ?


मागील दोन वर्षांपासून राज्यातील शेतकरी हे कुसुम सोलर पंप साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी काही बनावट वेबसाइट करून शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की कुसुम सोलर पंप योजना ही महा ऊर्जा या विभागाकडून राबविण्यात येते आणि या विभागाचे फक्त एकच अधिकृत संकेतस्थळ आहे (www.mahaurja.com)

सध्या लाभार्थ्यांच्या काही याद्या ह्या आधार आणि मोबाइल क्रमांक सहित सोशल मीडिया वरती प्रसारित झालेल्या आहेत. यामध्ये मोबाइल क्रमांक असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना SMS किंवा कॉल करून आपली निवड झाली असून आपण पेमेंट करावे असे सांगितल्या जात आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे की या योजनेमध्ये अगोदर आपल्या शेताचा सेल्फ सर्वे करावा लागतो आणि तो सर्वे हा महाऊर्जा च्या अधिकृत मोबाइल अॅप्लिकेशन द्वारेच करता येतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याच अधिकृत अॅप्लिकेशन मध्ये पेमेंट ऑप्शन येत असते. परंतु, सध्या लाभार्थ्यांचे मोबाइल क्रमांक सहित याद्या प्रसारित झाल्यामुळे शेतकऱ्यांना बनावट वेबसाइट आणि अॅप्लिकेशन किंवा लिंक पाठवून पेमेंट करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत तर यासाठी कोणीही कोठे पेमेंट करू नये आणि आपल्याला पेमेंट ऑप्शन / सेल्फ सर्वे संदेश Kusum Solar Payment आला असेल तर आपण महाऊर्जा च्या आपल्या जिल्ह्यातील कार्यालयात जाऊन विचारपूस करून च निर्णय घ्यावा.


तर, शेतकरी बांधवानो असा कोणताही पेमेंट करण्या विषयी आपल्याला संदेश आला असेल तर आपण अगोदर आपल्या महाऊर्जा जिल्हा कार्यालयात संपर्क करून कन्फर्म करावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा.

जर, आपल्याला संदेश आला असेल तर खालील पद्धतीने आपण सेल्फ सर्वे करू शकता.

असा करा सेल्फ सर्वे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने