Top News

EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...

 







EPFO Balance Check: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेधारकांना त्यांच्या खात्यातील जमा रक्कम तपासायची असेल तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जमा रक्कम तपासणे हे फार फार सोपे आहे.

 तुमच्या जवळ असेल्या मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्याची माहिती मिळवू शकता. पीएफ बॅलेन्स एकूण चार पद्धतींनी तपासता येते.

 

ईपीएफओ सबस्क्राईबर्स पासबूक पोर्टलच्या मदतीने त्यांच्या खात्यावर असलेली जमा रक्कम चेक करू शकतात. त्यासाठी खातेधारकांना पासबुक पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे लागेल. लॉगिन करण्यासाठी तुमच्याकडे यूएएन नंबर तसेच पासवर्ड असणे गरजेचे आहे. यूएए नंबर आणि पासवर्ड टाकल्यावर काही मिनिटांत तुम्हाला तुमच्या ईपीएफओ खात्यावर असलेले बॅलेन्स दिसेल.

  



उमंग अॅपच्या मदतीनेदेखील तुम्हाल पीएफ बॅलेन्स चेक करता येईल. त्यासाठी यूएएन नंबर आणि पासवर्ड लागेल.

  

 
एसएमएसच्या मदतीनेही तुम्ही ईपीएफ बॅलेन्स चेक करू शकता. त्यासाठी रजिस्टर मोबाइल नंबरवरून तुम्हाला 7738299899 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला पीएफ बॅलेन्सची माहिती मिळेल.

 
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मीस्ड कॉल दिला तरीदेखील तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएसच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्सची सर्व माहिती मिळेल.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने