महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर कृषि विभाग मार्फत सर्व योजना राबविल्या जात आहेत MahaDBT Seed Subsidy यामध्ये कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, बियाणे अनुदान व इतर सर्व योजना ह्या महाडीबीटी पोर्टल द्वारे राबविल्या जात आहेत.
महाडीबीटी पोर्टल वर कृषि विभाग च्या सर्व योजनांसाठी 24 तास अर्ज सुरू आहेत सर्व शेतकरी हे कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करू शकतात.
खरीप हंगाम 2024 करिता कृषि विभाग मार्फत नियोजन झालेले असून आता महाडीबीटी पोर्टल वर बियाणे घटकासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत. MahaDBT Seed Subsidy
बियाणे घटक मध्ये कृषि विभाग मार्फत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक बियाणे या दोन घटकासाठी अर्ज स्वीकारले जातात. MahaDBT Seed Subsidy यामध्ये प्रमाणित बियाण्या मध्ये निवड झाल्यानंतर शेतकऱ्याला 50% अनुदानावरती बियाणे दिले जाते आणि पीक प्रात्यक्षिक मध्ये निवड झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्या पिकाचे नवीन वाण हे मोफत दिले जाते.
तर, शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर प्रमाणित बियाणे आणि प्रात्यक्षिक बियाणे घटकाकरिता पोर्टल वर अर्ज सादर करावेत. त्यानंतर, पोर्टल द्वारे सोडत यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि निवड
झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे अनुदानावरती देण्यात येणार आहे.
MahaDBT Seed Subsidy
महाडीबीटी बियाणे अनुदान साठी अर्ज :
अर्ज करण्याचे संकेतस्थळ : येथे पहा/क्लिक करा
ऑनलाइन अर्ज सुरुवात : 11 मे 2024
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 26 मे 2024 (बदल होऊ शकतो)
पीक : सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका इ.
अनुदान : प्रमाणित बियाणे 50%, प्रात्यक्षिक बियाणे 100%
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत : येथे पहा/क्लिक करा
बियाणे अनुदान साठी अर्ज करण्यासाठी : येथे पहा/क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा