HMD Global brings back Nokia 3210 : आपल्यापैकी बहुतांश जणांचा पहिला मोबाईल फोन हा नोकिया कंपनीचाच असणार. सुमारे 25 वर्षांपूर्वी आलेला Nokia 3210 हा मोबाईल आजही लोकांना लक्षात आहे. कित्येकांसाठी हा फोन म्हणजे नॉस्टॅल्जियाच. नोकियाचे फोन बनवणाऱ्या HMD ग्लोबल या कंपनीने आता हाच फोन पुन्हा एकदा बाजारात आणला आहे.
काय नवं, काय जुनं ?
कंपनीने या फोनला नवीन डिझाईन आणि अपडेटेड स्पेसिफिकेशन्स सोबत लाँच केलं आहे. यामध्ये यूट्यूब शॉर्ट्स सारखे अॅप्स देखील देण्यात आले आहेत. या फोनमध्ये नोकियाचे सिग्नेचर गेम्स, T9 कीपॅड, ट्रॅकपॅड आणि सिंगल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.
काय आहेत फीचर्स ?
हा एक फीचर फोन आहे. यामध्ये 2.4 इंच मोठा TFT LCD QVGA कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. मागच्या बाजूला 2MP कॅमेरा आणि LED फ्लॅश दिला आहे. यामध्ये Unisoc T107 चिपसेट आहे. तसंच यात S30+ ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
यामध्ये 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन्स मिळतात. मायक्रो SD कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकतो. या फोनमध्ये 1450mAh क्षमतेची रिमूव्हेबल बॅटरी मिळेल. तसंच ब्लूटूथ 5.0, USB-c चार्जिंग पोर्ट आणि ड्युअल 4G सिम स्लॉट उपलब्ध आहेत. 3.5mm हेडफोन जॅक आणि FM रेडिओ असे फीचर्स देखील
यात उपलब्ध आहेत.
किती आहे किंमत?
नोकियाने हा फोन सध्या केवळ युरोपीय मार्केटमध्ये लाँच केला आहे. युरोपात याची किंमत 89 युरो, म्हणजेच सुमारे 7,990 रुपये आहे. हा फोन सध्या जर्मनी, स्पेन आणि यूकेमध्ये उपलब्ध आहे. गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.
भारतात हा फोन कधी लाँच होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र लवकरच हा फोन भारतात येईल असं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा