Top News

लाडकी बहीण योजना पैसे कोणत्या बँक खात्यात येणार ? तुमचा आधार नंबर टाकून चेक करा : DBT Status Check

 




DBT Status Check  : मित्रांनो, राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्यानंतर राज्यातील बहुतांश पात्र महिलांकडून संबंधित योजनेचे फॉर्म भरण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजना फॉर्म भरल्यानंतर फॉर्म अप्रुव्हल प्रक्रिया सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर फॉर्म शासनाकडून मंजूर करण्यात येत आहेत. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.

लाडकी बहीण योजना पैसे कोणत्या बँकेत येणार ?

शासनाकडून घोषणा करण्यात आलेली आहे की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात दिला जाणार आहे; परंतु बहुतांश लाभार्थ्यांना माहीत नसेल, की लाभ रक्कम कोणत्या बँकेत मिळेल. कारण तुम्ही पासबुक किंवा बँक अकाउंट कोणत्याही बँकेचा दिलेला असेल, तरी तुम्हाला रक्कम तुमच्या आधार लिंक बँक खात्यातच दिली जाणार आहे. आता यासाठी तुम्हाला तुमच्या कोणत्या बँक खात्याला आधार लिंक आहे, याची स्थिती ऑनलाईन तपासावी लागेल.

कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी (DBT) अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यावरती लाभ रक्कम पाठविण्यात येईल. कोणत्याही प्रकारची बँक डिटेल्स रक्कम पाठवताना तपासली जाणार नाही, कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत आधार लिंक बँक खात्यावरती एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर खात्यात रक्कम पाठविण्यात येते. त्यामुळे तुमचा आधारकार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे, याची ऑनलाईन स्थिती तपासणे आवश्यक आहे.

How To Check DBT Status For Ladki Bahin Yojana

बऱ्याच लोकांकडे एकापेक्षा जास्त बँकेत अकाउंट असतात, त्यामुळे त्यांना नेमकं कोणत्या बँके खात्यात आपली रक्कम येईल, यामध्ये संभ्रमण निर्माण होतो. आपला आधार क्रमांक नेमक कोणत्या बँकेला लिंक आहे. नियमानुसार आपला आधार क्रमांक प्रत्येक बँक खात्याला लिंक असावा; परंतु डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एकाच बँक अकाउंटला आधारकार्ड लिंक करता येईल. आता तुमचा आधारकार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. तुम्ही खालीलप्रमाणे चेक करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्ही येथे क्लिक करा आणि आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
  • आधार क्रमांक टाकल्यानंतर खालीलप्रमाणे कॅपच्या टाकून लॉगिन विथ ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता तुमच्यासमोर भरपूर पर्याय दिसतील, त्यामधील Bank Seeding Status या बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला congratulations your aadhaar mapping has been done असा मेसेज येईल.
  • खालीलप्रमाणे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दिसेल त्यामध्ये तुम्हाला फक्त शेवटचे चार अंक दिसतील आणि बँकेचे नाव दिसेल म्हणजेच कोणत्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे.

याच बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत आणि नक्कीच तुमचा या बँकेमध्ये खाता असेल, त्यामुळेच याठिकाणी माहिती दर्शवत आहे, तर या बँकेचा अकाउंटच तुम्हाला चेक करायचा आहे; कारण याच बँक अकाउंटमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने