Jio, Airtel आणि Vi यांनी दरवाढ केल्यापासून BSNL कडे वळणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. BSNL च्या स्वस्त प्लॅन्सचा सर्वाना फायदा घ्यायचा आहे, परंतु अजूनही सरकारी कंपनीकडे 4G नेटवर्क नाही ही बाब अनेकांना खटकते. BSNL नं यावर देखील काम करण्यास सुरुवात केली असून आपल्या 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी आतापर्यंत 25,000 4G टॉवर उभारले आहेत. तसेच लवकरच 100,000 टॉवर उभारले जातील, ज्यामुळे 4G नेटवर्क उपलब्ध होईल.
त्याआधी तुमचं सिम 4G एनेबल्ड आहे का नाही हे चेक करण्याची पद्धत BSNL राजस्थाननं सांगितली आहे. तसेच जर तुमचं सिम 4G एनेबल्ड नसेल तर ते तुम्ही मोफत बदलू देखील शकता. यासाठी तुम्हाला नजीकच्या BSNL ऑफिस किंवा स्टोरवर जावं लागेल. जर तुम्ही BSNL वापरत असाल आणि तुमच्या सिममध्ये 4G नेटवर्क सपोर्ट आहे की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
BSNL सिम 4G नेटवर्क सपोर्टची माहिती घेण्याची पद्धत
सर्वप्रथम तुमच्या पसंतीचा इंटरनेट ब्राऊजर ओपन करा
तिथे पुढील वेबसाइटवर जा: https://rajasthan.bsnl.co.in/4G/getmobileinfo.php
तिथे मोबाइल नंबरसाठी एक रकाना दिला आहे त्यात तुमचा BSNL मोबाइल नंबर टाका.
मोबाइल नंबर टाकल्यावर सबमिटवर क्लिक करा.
एवढं केल्यावर पुढील पेजवर तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचं सिम 4G नेटवर्क इनेबल्ड आहे की नाही.
महत्वाची सूचना: ही वेबसाइट बीएसएनएलच्या राजस्थान सर्कलसाठी आहे, कंपनीच्या महाराष्ट्र सर्कलच्या वेबसाइटवर अशी कोणतीही सुविधा दिसली नाही. महाराष्ट्र बीएसएनएलनं अशी सुविधा सादर केल्यास वाचकांना दिली जाईल.
BSNL Live TV
BSNLनं अलीकडेच “BSNL Live TV” अॅप अँड्रॉइड टीव्हीसाठी लाँच केलं आहे. युजर्स गुगल प्ले स्टोरवर जाऊन त्यांच्या अँड्रॉइड टीव्हीवर हे अॅप सहज डाउनलोड करू शकतात. अॅॅप इन्स्टॉल झाल्यानंतर 9424700333 या मोबाईल नंबरवर एक मिस्ड कॉल दिल्यास अॅप अॅक्टिव्हेट होईल. सध्या याचं मध्य प्रदेशयामध्ये टेस्टिंग सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा