Cibil Score: प्रत्येक कर्मचारी जेव्हा नवीन कंपनीत रुजू होता तव्हा त्याला कपनाकडून नवीन पगार खात उघडण्यास सांगितले जाते. नवीन खाती उघडल्यानंतर, जुनी खाती बंद करायला आपण विसरतो. तुमच्या नावावर एकपेक्षा जास्त बँक खाती असल्यास तुमच्यावर विनाकारण अनेक प्रकारचे शुल्क लादले जाऊ शकते. त्याच वेळी, तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो.
एकापेक्षा जास्त बँक खाती असण्याचे काय नुकसान होते ते जाणून घेऊया. कोणत्याही पगार खात्यात (Salary Account) तीन महिन्यांपर्यंत पगार मिळाला नाही तर ते बचत खात्यात रूपांतरित होते. त्याचे बचत खात्यात रूपांतर झाल्याने खात्याबाबत बँकेचे नियम बदलतात.
मग बँका त्याला बचत खाते मानतात. बँकेच्या नियमांनुसार प्रत्येक खात्यात किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही किमान रक्कम न ठेवल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल आणि बँक तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेतून पैसे कापून घेऊ शकते.
एकपेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असल्यास तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या प्रत्येक खात्यात तुम्हाला त्यात निश्चित रक्कम (किमान शिल्लक) ठेवावी लागेल. याचा अर्थ एकपेक्षा जास्त खाती असल्यास तुमची मोठी रक्कम बँकांमध्ये अडकेल.
तुम्हाला त्या रकमेवर जास्तीत जास्त 4 ते 5 टक्के वार्षिक परतावा मिळेल. त्याच वेळी, जर बचत खात्यात पैसे ठेवण्याऐवजी, तुम्ही ते इतर योजनांमध्ये गुंतवले, तर तुम्हाला वार्षिक परताव्याच्या स्वरूपात अधिक व्याज मिळेल. एकापेक्षा जास्त खाती असल्यामुळे, तुम्हाला वार्षिक देखभाल शुल्क आणि सेवा शुल्क भरावे लागेल.
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त, बँक इतर बँकिंग सुविधांसाठी देखील पैसे घेतात. त्यामुळे तुमचा खर्च आणखी जास्त वाढतो. क्रेडिट स्कोर खराब होतो एकपेक्षा जास्त निष्क्रिय खाती असल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होतो.
तुमच्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो. म्हणून, निष्क्रिय खाते चालू ठेवू नका आणि नोकरी सोडल्याबरोबर ते खाते बंद करा.
आयकर विभागाचे लक्ष अधिक बँकांमध्ये खाती असल्याने तुमचे खाते आयकर विभागाच्या देखरेखीखाली येण्याची शक्यता आहे. आयकर (ITR रिटर्न फाइल) भरताना सर्व बँक खात्यांशी संबंधित माहिती जपून ठेवावी लागते. अनेकदा त्यांच्या स्टेटमेंटच्या नोंदी जपून ठेवाव्या लागतात. तुम्ही सर्व बँकांचे तपशील न दिल्यास, तुम्ही आयकर विभागाच्या रडारखाली येण्याची शक्यता असते.
टिप्पणी पोस्ट करा