Top News

Soyabin Kapus anudan status : असे तपासा सोयाबीन व कापूस अनुदान स्टेटस ? | किती रक्कम, कोणते बँक खाते पहा

 



Soyabin Kapus anudan status: राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू आहे.




त्यानुसार कृषि आयुक्तालया मार्फत ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, या यादी मध्ये पीक पाहणी केलेल्या काही शेतकऱ्यांची देखील नावे दिसत नव्हती. त्यामुळे आता ई पीक पाहणी एवजी आता सातबारा वरती खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस पिकाची नोंद असेल तर आता त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी पात्र करण्यात येणार आहे. (Soyabin Kapus anudan status) दिनांक 02 ऑक्टोबर पासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये सोयाबीन व कापूस अनुदान वितरण सुरू करण्यात आलेले आहे. तर, आपण आपल्याला किती अनुदान रक्कम जमा झाली आहे आणि कोणत्या बँक खात्या मध्ये जमा झाली आहे हे या ठिकाणी दिलेल्या पद्धती वरुण पाहू शकता. (Soyabin Kapus anudan status) असे तपासा सोयाबीन व कापूस अनुदान स्टेटस ? (Soyabin Kapus anudan status) 

स्टेप 1: प्रथम आपण खालील दिलेल्या लिंक वरती भेट द्यावी

स्टेप 2 : Disbursement Status वरती क्लिक करावे स्टेप 

3 : पुढे आपला आधार क्रमांक आणि कॅप्त्वा टाकून OTP वर टिक करावे आणि Get Aadhar OTP वरती क्लिक करावे (आधार शी मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक)

 स्टेप 4 : त्यानंतर आपल्या आधार नोंदनिकृत मोबाइल वरती OTP पाठविला जाईल तो टाकून Get Data वर क्लिक करावे. 

स्टेप 5 : त्यानंतर आपण OTP टाकल्यानंतर तो OTP जुळळ्यास आपल्याला आपले अनुदान रक्कम, जमा करण्यात आलेले बँक खाते, आणि जमा केलेला दिनांक ही माहिती दर्शीविली जाईल.



आपले स्टेटस पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या : 


सोयाबीन कापूस अनुदान स्टेटस पोर्टल लिंक <


सोयाबीन व कापूस अनुदान स्टेटस माहिती पुस्तक : डाऊनलोड करा




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने