Top News

10वी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरी, महिना 20 हजार पगार.. संधी चुकवू नका | Post Office Bharti 2024

 



मुंबई | भारतीय टपाल विभाग सातत्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असतो. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेनुसार पोस्ट विभाग अंतर्गत ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदाची भरती (Post Office Bharti 2024) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.



पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाची ही भरती जम्मू काश्मीर सर्कलमध्ये केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पध्दतीने दिलेल्या पत्यावर अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज योग्य त्या कागदपत्रांसहित लिफाफ्यातून सहायक पोस्टमास्टर जनरल (भरती), 0/o मुख्य पोस्ट मास्टर जनरल, जम्मू-कश्मीर सर्कल, मेघदूत भवन, रेलहेड कॉम्प्लेक्स जम्मू – 180012 या पत्यावर पाठवावेत लागतील.


अर्ज कसा कराल?

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरती सेक्शन मधील अधिसुचना पाहावी. या अधिसूचनेतील अर्जाच्या नमुन्याची प्रिंट काढून हा अर्ज भरून लिफाफ्यातून पाठवावा.



शैक्षणिक पात्रता –

पोस्ट ऑफिस भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक योग्यता 10वी पास ठेवली आहे.


वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20200 वेतन दिले जाईल.


PDF जाहिरात – Post Office Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने