Top News

30 हजार पगार.. पदवीधारकांना नोकरीची संधी; कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती | Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024

 



कोल्हापूर |  कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत आयटी अधिकारी, आयटी लिपिक पदांची भरती (Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024) केली जाणार आहे.


  यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.


वरील रिक्त पदांच्या एकूण 02 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., १४५८ बी, जी एन चेंबर्स कोळेकर तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर – ४१६०१२ या पत्त्यावर पाठवावेत.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारीB.E./B.Tech/M.E./M.Tech in Computer Science MCA/MCS with minimum 60% marks or equivalent grade with First Class
आयटी लिपिकPassed Degree or Diploma course in Computer Science from a recognized institute
पदाचे नाववेतनश्रेणी
आयटी अधिकारीरु. २०,०००/- ते ३०,०००/- प्रतिमाह
आयटी लिपिकरु. १२,०००/- ते १५,०००/- प्रतिमाह

या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – Kolhapur Urban Bank Association Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://kopbankasso.com/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने