Top News

अमरावती महानगरपालिका अंतर्गत एकूण २०८७ पदांसाठी भरती; आकृतीबंधास मान्यता | Amravati Mahanagarpalika Bharti 2024

 


अमरावती | अमरावती महानगरपालिका अंतर्गत एकूण २०८७ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. या भरती (Amravati Mahanagarpalika Bharti 2024) द्वारे एकूण ४१ विभागातील विभिन्न पदांवर भरती करण्यात येणार आहे.


अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध खाली दिलेला आहे.



 उमेदवार खालील लिंकद्वारे आकृतीबंध PDF डाउनलोड करू शकता.


अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र. १५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ अन्वये मान्यता प्राप्त तसेच, आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार, यापूर्वी ४१ विभागांतील काही संवर्गातील शासन निर्णयांद्वारे व ठरावांद्वारे मान्यता प्राप्त २४५७ पदांपैकी ६५० पदे व्यपगत केल्याने, तसेच २८० पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या एकूण २०८७ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.



अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र. १५३/२०२४, दि.१२.०१.२०२४, तसेच आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५१ (४) नुसार शासनास असलेल्या अधिकाराचा वापर करुन यासोबतच्या प्रपत्र-ब व ई मध्ये नमूद पदांच्या गोषवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध व प्रपत्र अ, आ, क, ड व इ यांना परिच्छेद क्रमांक ५ मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.


२. सोबत जोडलेल्या प्रपत्र अ, आ, ब, क, ड, इव ई चे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:-
अ) यापूर्वी अमरावती महानगरपालिकेकरीता शासनाने वेळोवेळी शासन निर्णयांद्वारे मंजूर केलेल्या ५८ पदांचे विवरण प्रपत्र- अ नुसार, तसेच अमरावती महानगरपालिकेने विविध ठरावांन्वये मंजूर केलेल्या २३९८ पदांचे विवरण प्रपत्र- आ नुसार दर्शविण्यात आले आहे.



ब) सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र-ब मधील स्तंभ क्र. (६) मध्ये नमूद करण्यात आलेली २८० नवीन पदे निर्माण करण्यास व प्रपत्र- इ मध्ये नमूद केल्यानुसार एकूण ६५० पदे व्यपगत करण्यात येत आहेत.


Download Amravati Mahanagarpalika Bharti 2024 PDF 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने