या योजने अंतर्गत वय वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच श्रावण बाळ योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातर्फे राबविली जाते.जर तुमच्या घरातही तुमची आई वडील किंवा इतर एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहे व कोणते कागदपत्रे लागणार आहे आणि अर्ज कोठे करायचा व कसा करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुमच्या घरातील वय वृद्ध व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येयील.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची वय ही ६५ वर्ष किंवा यापेक्षा जास्त असावी.
श्रावण बाळ योजना स्वरूप
ही योजना २०१६ सली सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला दर महिन्याला आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी मात्र एक अट आहे ती म्हणजे लाभार्थी हा ६५ वर्ष किंवा यापेक्षा जास्त पाहिजे.
लाभाची रक्कम ही अर्जदाराच्या खात्यात पाठविली जाणार आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. लाभार्थी या योजनेसाठी दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाईन अर्ज कसा करायचा बघा खालीलप्रमाणे.
श्रावण बाळ योजना असा करा ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्यासाठी आपले सरकार या आधिकृत वेबसाईटवर जा.आता तुम्हाला याठिकाणी new user registration असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
याठिकाणी तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे.लॉगिन झाल्यावर तुम्हाला याठिकाणी शोधा असे बटण दिसेल त्यावर क्लिक करा आणि श्रावण बाळ हे शोधा. यापुढे अर्जदार निर्णय घ्या यावर टच करा.
आता लाभार्थ्याला याठिकाणी काही माहिती भरायची ही माहिती योग्य प्रकारे भरा.अशा प्रकारे तुम्ही याठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता.
जर तुम्हाला अर्ज pdf मध्ये डाऊनलोड करायचा असेल खाली अर्ज डाऊनलोड करा या बटणावर क्लिक करा.
कागदपत्रे
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा मागील 15 वर्ष पासून.
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वयाचा दाखला म्हणून किंवा आधारकार्ड.
लाभार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदान कार्ड.
लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे २१ हजार किंवा यापेक्षा कमी असावे याचे प्रमाणपत्र.
लाभार्थी हा दारिद्र्य रेशेतील असावा आणि बी पी ल रेशनकार्ड धारक असावा.
लाभार्थ्याचा चालू मोबाईल क्रमांक आणि ज्या बँक खात्यामध्ये ही निधी जमा होणार आहे त्याचे पासबुक प्रत.
टिप्पणी पोस्ट करा