बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर यापेक्षा मोठी संधी भेटनार नाही. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये तब्बल 0358 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये लिपीक व शिपाई ही पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता ही या भरतीसाठी पदवीधर व १०वी पास उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही लिपिक २१ ते ३८ वर्षे तर शिपाई १८ ते ३८ वर्षे असलेले उमेदवार पात्र ठरतील. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
नियम व अटी: निवड प्रक्रिया सुरु झालेनंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती / कागदपत्रे तपासणी नंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करणेत येईल. त्याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार/ विनंती विचारात घेतली जाणार नाही. उमेदवारांनी भरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेत स्थळावर सुचना पाहाव्यात. संकेत स्थळावरील सुचना पाहिल्या नाहीत यास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाहीत. या भरती प्रक्रिया अनुषंगाने कोणत्याही उमेदवाराशी स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
विविध पदाकरीता बँकेच्या www.cdccbank.co.in या अधिकृत संकेत स्थळावरुन ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक चुकीचा/ अपूर्ण असल्यास तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपुर्ण प्रक्रिये दरम्यान त्याव्दारे पाठविल्या जाणा-या सुचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील. त्याचप्रमाणे ई-मेल आयडी व संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणींना एजन्सी जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणा- या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. १९ऑक्टोबर २०२४, रात्री १२.०० वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
टिप्पणी पोस्ट करा