Kisan Credit Card Apply: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारतातील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे.
केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे. ॲग्री स्टॉक या आजच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे.
राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ईपीक पाहणी अर्थात पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एक ॲप विकसित करण्यात आले आहे. याच ॲपच्या पद्धतीवर केंद्राकडून संपूर्ण देशासाठी एकाच ॲप मधून पिकाची नोंदणी करण्याचे ठरवले गेले आहे.
आगामी खरीप हंगामापासून देशभरात एकच ॲप वर पिकाची नोंदणी केली जात आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची बिनचूक नोंद होणार असल्याचे सांगीतले जात आहे.
प्रक्रिया कशी असेल? | Kisan Credit Card Apply
ॲप डाऊनलोड केल्यानंतर आणि आधार कार्ड टाकल्यावर ओटीपीतून पडताळणी होईल. फेस आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटवण्यात येईल. शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकेच्या कर्जाची ऑफर दिसेल. त्या ऑफर्स मधून एक वापर स्वीकारून दहा मिनिटात प्रक्रिया करून अर्ज जमा होईल. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून एक लाख साठ हजार पर्यंतचे कर्जाला कोणतेही तारण लागणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा