रमाई घरकुल आवस योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये लाभार्थ्याला अनुदान देण्यात येणार.
या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा, कोठे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे
ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना अडचण येणार नाही.या योजनेचे नाव रमाई घरकुल आवस योजना असे आहे. ही योजना ग्रामविकास व गृहनिर्माण या विभागातर्फे राबविली जाते
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र महाराष्ट्रातील लाभार्थी पात्र आहे. लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थी ऑनलाईन आणि ऑफाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो.रमाई घरकुल आवस योजना अंतर्गत अनुदान कसे मिळणार व किती मिळणार बघा संपूर्ण माहिती खालीप्रमाणे.
रमाई घरकुल आवस योजना स्वरूप
या योजेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला घरकुलसाठी अनुदान देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही अशा लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये तीन प्रकारचे अनुदान देण्यात येणार आहे बघा खालीलप्रमाणे.
शहरी भाग, डोंगराळ आणि ग्रामीण (सर्वसाधारण भाग) अशा प्रकारे अनुदान देण्यात येणार आहे.यामध्ये शहरी भागात २ लाख ५० हजार इतकी आर्थिक रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
तसेच डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना १ लाख ४२ हजार इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत एकूण १ लाख ३२ हजार इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
हे अनुदान तीन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँकेत जमा करण्यात येणार आहे.ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० टक्के आणि उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला देण्यात येणार आहे.
कोणते लाभार्थी आहे पात्र
याचा फक्त महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी पात्र ठरणार आहे.
लाभार्थी हा बौद्ध किंवा अनुसूची जातीचा असायला हवा.
लाभार्थ्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कागदपत्रे
लाभार्थ्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान कार्ड.
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
Cast certificate.
लाभार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो.
जो लाभार्थी या योजनेचा लाभ घेणार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा (मागील 15 वर्षापासून).
स्टॅम्प पेपर.
जॉइंट बँक अकाउंट.
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
कर पावती.बीपीएल.
असा करा अर्ज
जर लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या अधिकृत वेबसाईटवर या.
आता तुम्हाला नगरपरिषद व नगरपंचायत या पर्यायावर टच करायचे आहे.
आता तुम्हाला या ठिकाणी रमाई घरकुल आवास योजना असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
यानंतर तुमच्यासमोर एक एक अर्ज निर्माण होईल.
अर्जामध्ये योग्य माहिती भरा आणि सबमिट करा.
तुमचा अर्ज या ठिकाणी सादर झालेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा