Top News

Lakhpati Didi Yojna : देशातील महिलांना लखपती दीदी योजनेतून बिना व्याजी ५ लाखांचे कर्ज




  Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेबाबत घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला होता.



  लखपती दीदी योजनेतंर्गत देशभरातील खेड्यातील २ कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणातंर्गत महिलांना एलईडी बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्ती करण्यासह प्लंबिंगचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती वेळोवेळी केंद्र सरकारने दिली आहे. तर ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जात असल्याचाही दावा सरकारने केला आहे.

योजनेंतर्गत कर्जाची प्रक्रिया


या योजनेंतर्गत कर्जाची मागणी करण्याआधी महिलेची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असणे गरजेची आहे. नोंद असेल तर विभागीय बचत गट कार्यालयात अर्जाद्वारे कर्जाची करता येते. व्यवसाय योजनेसह आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर छाननी आणि अर्जांची पाहणीनंतर संबंधीत महिला कर्जासाठी पात्र ठरते.


 

लखपती दीदी योजनेतंर्गत कोण पात्र?


१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असून त्या अर्ज करू शकतात.


तर या योजनेसाठी महिला बचत गटाचा हिस्सा असणे महत्त्वाचे आहे.


याशिवाय महिलांनी व्यवसायाच्या योजनेसह आवश्यक कागदपत्रेही सादर करावीत


आवश्यक कागदपत्रे


पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, एक फोटो


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने