Top News

सरकारकडून ७५ टक्के अनुदान घ्या आणि स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करा! दुधाळ गाय, म्हशीवर मिळणार अनुदान, या ठिकाणी करा संपर्क

 




कृषी क्षेत्र आणि कृषीशी निगडित असलेले जोडधंदे यांना प्रोत्साहन मिळावे व शेतकऱ्यांची आर्थिक दृष्टिकोनातून भरभराट व्हावी याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात व या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक पाठबळ संबंधित लाभार्थ्यांना देण्यात येते.


 


शेतीशी संबंधित व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये पशुसंवर्धन व्यवसाय हा महत्वाचा व्यवसाय असून दूधउत्पादनाच्या दृष्टिकोनातून या व्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पशुसंवर्धन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्य सरकारच्या जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबवण्यात येतात व या माध्यमातून देखील अनुदान मिळते.


त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण आणि शेतकऱ्यांना स्वतःचा दुध व्यवसाय सुरू करणे अतिशय सोपे होते. अशाच प्रकारची एक महत्वाची योजना जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असून याकरिता अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 75 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गांना 50 टक्के इतके अनुदान या माध्यमातून दिले जात आहे.


 दुधाळ जनावरांवर मिळणार अनुदान


 


याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून  वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावर वाटप करण्यात येते व या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 75 व सर्वसाधारण गटाला 50 टक्के अनुदानाचा लाभ मिळतो.


या योजनेचे स्वरूप बघितले तर यामध्ये लाभार्थ्याला दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करण्यात येतो. यामध्ये गायीच्या गटाकरिता 75 टक्के म्हणजेच एक लाख 17 हजार 668 रुपये अनुदान मिळते तर म्हशीच्या एका गटाकरिता एक लाख 34 हजार 443 रुपये अनुदान मिळते. याकरिता शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.


पशुसंवर्धन व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे व मूळ प्रवाहात हा व्यवसाय यावा याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून 75% पर्यंत अनुदान देऊन दुधाळ जनावरांचे वाटप पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येते. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा यासाठीचे प्रयत्न जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहेत.


 


 या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष


1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणे गरजेचे आहे.


2- लाभार्थी जर दारिद्र्यरेषेखालील असेल तर अशा लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.


3- याशिवाय अत्यल्पभूधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना देखील याचा लाभ मिळतो.


 यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो


जरा तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो यासाठी अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतो. महाबीएमएस या संकेतस्थळावर यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असते व त्यानंतर पात्र उमेदवारांना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येते.


 या योजनेच्या अधिक माहितीसाठी कुठे संपर्क कराल?


तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेच्या अधिक माहिती करिता पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधून अधिकची माहिती मिळवून लाभ घेऊ शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने