RTE Admission 2024: आजच्या या आर्टिकल मध्ये आपण RTE फॉर्म कसा भरायचा? यासंबंधीची सविस्तर अशी अर्ज प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
RTE द्वारे जे विद्यार्थी अर्ज करतात त्यांना मोफत प्रवेश तसेच शिक्षण मिळवता येते, यामध्ये विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येतो.
आता नवीन अपडेट नुसार RTE Admission सुरू झाले आहेत, तुम्ही जर पालक असाल तर तुम्ही तुमच्या पाल्याला खाजगी तसेच सरकारी शाळेमध्ये निशुल्क प्रवेश मिळवून देऊ शकता.
यामध्ये आरक्षित अशा प्रवर्गासाठी 25% जागा राखीव असणार आहेत, याचा फायदा आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा प्रवर्गातील कुटुंबांना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थी कोणत्याही आर्थिक दडपणाविना त्याचे शिक्षण पूर्ण करू शकतो.
RTE Admission साठी आता अधिकृत स्वरूपात नव्याने पोर्टल सुरू झाले आहे, शासनाने काही कालावधी पूर्वी प्रवेश बंद केले होते परंतु आता पुन्हा एकदा RTE पोर्टल सुरू झाले आहे.
मुख्य स्वरूपाची बाब म्हणजे ज्या पालकांनी त्यांच्या पाल्याचे RTE Admission यापूर्वी केले होते त्यांना आता नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. नवीन अर्ज प्रक्रिया 17 मे 2024 पासून सुरू झाली आहे, त्यामुळे जर तुम्ही आगोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करायचा आहे, जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुमच्या पाल्याला RTE अंतर्गत Admission मिळणार नाही.
यापूर्वी शासनाने RTE Admission संबंधी जे नवीन नियम लागू केले होते, त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे आठवडाभर RTE Admission बंद होते, पण आता ते नव्याने सुरू झाले आहेत.
RTE Admission २०२४ Form Online Application
या सेक्शन मध्ये मी तुम्हाला RTE Form Kasa Bharaycha या संबंधी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. so माहिती पूर्ण वाचा, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आर्टिकल वाचून घ्या, अर्धवट वाचून फॉर्म भरताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे थोडा 5 मिनिटाचा वेळ काढून ही RTE Admission Form Online Application माहिती वाचा, कारण तुमच्या मुलाचे भविष्य यावर अवलंबून आहे.
RTE पोर्टल
भेट द्या
RTE Admission ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/05/2024
RTE फॉर्म कसा भरायचा? Step by step guide
सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या RTE Admission पोर्टल वर जायचे आहे, त्याची लिंक वर टेबल मध्ये मी दिली आहे.
वेबसाईटवर केल्यानंतर तेथे तुम्हाला होम पेजवर असलेल्या Online Application या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
पुढे तुम्हाला New Registation या लिंक वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून Application Numebr आणि Password Generate करायचा आहे.
सर्व माहिती भरून नोंदणी पूर्ण झाल्यावर Register या बटण वर क्लिक करायचे आहे, नंतर तुम्ही वर Generate केलेला Application Number आणि Password वापरून लॉगिन करू शकता.
तुमच्यासमोर RTE Admission Form Open होईल, फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती तुम्हाला अगदी अचूक पणे भरून घ्यायची आहे.
माहिती जर चुकीची आढळली तर Addmission Cancel केले जाईल याची काळजी घ्या, कारण छोटी जरी चूक झाली तर फॉर्म बाद केला जातो.
अर्ज सादर करताना काही स्टेप नुसार फॉर्म भरावा लागतो, त्यामध्ये तुम्हाला ज्या शाळेत Admission घ्यायचे आहे त्यामध्ये 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या परिघातील शाळा निवडताना जास्तीत जास्त केवळ 10 शाळा निवडता येतात.
यासोबत RTE Admission Form Apply करताना जे आवश्यक Documents विचारले आहेत, ते सर्व अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज करताना हे कागदपत्रे Soft Copy मध्ये लागतात, आणि जेव्हा लॉटरी लागेल तेव्हा ते Hard Copy मध्ये लागतात त्यामुळे आगोदर याची तयारी करून ठेवायची आहे.
शेवटी सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा RTE Form तपासून Verify करून घ्यायचा आहे, अर्ज चुकला असेल तर तेव्हाच तो दुरुस्त करायचा आहे किंवा तो फॉर्म डिलीट करुन नवीन अर्ज करायचा आहे. पण जर तुम्ही अर्ज सबमिट केला तर तुम्हाला नंतर कोणतेही Changes करता येणार नाहीत, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.
टीप: जर तुम्हाला स्वतःला RTE Online Form भरता येत नसेल, तर कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन अर्ज करून घ्या. कारण तुम्ही अर्ज करताना काही चूक करू शकता, पण ज्यांना RTE Admission Form संबंधी संपूर्ण माहिती असते त्यांच्या द्वारे जर अर्ज केला तर अर्ज बाद होण्याची शक्यता कमी असते.
RTE Admission 2024 Important Instruction (पालकांकरीता सूचना)
RTE Admission 2024 Important Instruction
RTE Admission 2024 प्रवेश प्रक्रिया 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे, पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा.
१ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये, एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31/05/2024 पर्यंत राहील.
दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
टिप्पणी पोस्ट करा