Top News

५० हजार प्रोत्साहन अनुदानासाठी ७ सप्टेंबर पर्यंत हे काम करा अन्यथा अनुदान मिळणार नाही




  ५० हजार प्रोत्साहन अनुदान योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणली आहे त्यातील काही शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळाले नाही त्यांना आता लाभ मिळणार आहे.


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे


या मुदतीत आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले.


५० हजार प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यास पात्र शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. आधार प्रमाणीकरणानंतरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत एसएमएस देण्यात आला आहे.


सर्व बँकांनीदेखील पात्र शेतकऱ्यांना याबाबत व्यक्तिश: कळविणे आवश्यक आहे. ७ सप्टेंबरनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा बंद होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने