Top News

Success Story : अवघ्या 45 दिवसांत 5 लाखांची कमाई; एसी पोल्ट्रीतून शेतकऱ्याने साधली प्रगती !

 






अनादी काळापासून शेती समवेतच कुकुटपालनाचा आणि पशुपालनाचा

व्यवसाय (Success Story) केला जात आहे. कुकुट पालन व्यवसायात नवनवीन हायटेक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कुकूटपालन व्यवसाय केला जातो. मात्र, शेतीसमवेत केला जाणारा हा शेतीपूरक व्यवसाय अलीकडील काही वर्षांमध्ये विशेष लोकप्रिय बनला आहे. अनेकांना कुकुट पालन व्यवसायातून (Success Story) चांगली कमाई देखील होत आहे.





व्यवसायात लक्ष देणे महत्वाचे (Success Story Of Poultry Farming)

अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण येथील रावसाहेब पटारे यांनी देखील कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करून (Success Story) दाखवली आहे. रावसाहेब यांनी एसी पोल्ट्री फार्म सुरू करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या 45 दिवसात एसी पोल्ट्री फार्म मधून पाच लाख रुपये कमावले आहेत. यामुळे त्यांचा नाशिक येथे पोल्ट्री इंडिया एक्सपोकडून सत्कार करण्यात आला आहे. रावसाहेब यांनी, एसी पोल्ट्री फार्म उभारून जर चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर यासाठी या व्यवसायात जातीने लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.



साधनांची उपलब्धता

केवळ कामगारांच्या भरवशावर या व्यवसायात यश मिळवता येणे अशक्य आहे. ते सांगतात की, एसी पोल्ट्रीमध्ये अॅटोमॅटीक हवामान ठेवणारे कन्ट्रोलर असतात. पाण्यासाठी निपललाईन, खाद्यासाठी फीडरलाईन, फीडर लाईनला खाद्य पाठविणारे सायलो बंदिस्त असते. हवा आत येण्यासाठी कुलिंग पॅड आणि आतील दूषित हवा बाहेर फेकण्यासाठी असलेले फॅन असतात. या व्यवसायातील हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. याशिवाय एसी पोल्ट्रीत वीज हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यासाठी 24 तास वीज मिळणे आवश्यक आहे.



थायलंडच्या कंपनीने उभारले शेड

वरील सर्व गोष्टी योग्य पद्धतीने असतील तर या व्यवसायातून चांगली कमाई करता येणे शक्य आहे. रावसाहेब यांनी युट्युबवर ऑस्ट्रेलियातील एसी पोल्ट्री फार्मचा एक व्हिडिओ पाहिला होता. दरम्यान त्यांनी या एसी पोल्ट्री फार्मची शोधाशोध केली. एसी पोल्ट्री फार्मची शोधाशोध करत असताना त्यांना थायलंड येथील कंपनी अशा प्रकारचे शेड बनवत असल्याचे समजले. थायलंड मधील सीपीएफ नावाची कंपनी असे शेड बनवत असल्याने त्यांनी या कंपनीशी संपर्क साधला. मात्र आपल्या परिसरात असे शेड नसल्याने त्यांना सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी या कंपनीच्या मदतीने एसी शेड तयार केले.

किती झाली कमाई?

2018 मध्ये त्यांनी ब्रॉयलर पक्षांची पहिली बॅच टाकली. म्हणजेच ते जवळपास सहा वर्षांपासून एसी पोल्ट्री फार्म चालवत आहेत. विशेष म्हणजे ते विविध ठिकाणी जाऊन कार्यशाळेत एसी पोल्ट्री फार्मची माहिती देखील देत आहेत. त्यांनी कृषी विषयात शिक्षण घेतलेले आहे. त्यांना आजच्या घडीला या व्यवसायातून चांगली कमाई होत आहे. रावसाहेबांनी अवघ्या ४५ दिवसात म्हणजेच दीड महिन्याच्या कालावधीत एसी पोल्ट्री मधून पाच लाख रुपयांची कमाई केली आहे. यामुळे त्यांचा नुकताच नाशिक मध्ये सत्कार झाला असून नवयुवक तरुणांनी शेतीसोबतच इतर पूरक धंदे सुरू केले तर त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते हेच त्यांच्या या प्रयोगातून सिद्ध होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने