Top News

LIC : ‘एलआयसी’ला विमा हप्त्यातून १२ वर्षांतील उच्चांकी उत्पन्न

 






नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने एप्रिल महिन्यात विम्याच्या पहिल्या हप्त्याच्या माध्यमातून १२,३८३ कोटी रुपयांचे मागील १२ वर्षांतील उच्चांकी उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ‘एलआयसी’ला ५,८१० कोटी रुपये मिळाले होते. त्या तुलनेत यावेळी ११३ टक्क्यांची वाढ झाली आहे.





सर्वसामान्य लोकांमध्ये विम्याविषयी जागरूकता वाढल्याने विमा कंपन्यांच्या मासिक व्यवसायात वाढ होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.





LIC Cuts Stake: एलआयसीने 16 सरकारी कंपन्यांमधील हिस्सा केला कमी; काय आहे कारण?

‘एलआयसी’चे उत्पन्न वर्ष २०१४ नंतर प्रथमच उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. कंपनीचे नावीन्यपूर्ण विपणन धोरण, त्याची प्रभावी अंमलबजावणी, विश्वासार्हता आणि ग्राहककेंद्रित सेवांवर भर दिल्याने ही कामगिरी साध्य केल्याचे कंपनीने नमूद केले आहे.





वैयक्तिक हप्ता श्रेणी अंतर्गत, एलआयसीने एप्रिल २०२४ मध्ये एकूण ३,१७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, एप्रिल २०२३ मधील २,५३७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात २५.१७ टक्के वाढ झाली आहे, तर समूह हप्ता श्रेणी अंतर्गत एप्रिल २०२३ मधील ३,२३९ कोटींवरून एप्रिल २०२४ मध्ये ९,१४१ कोटी रुपये कमाई केली आहे.





यात वार्षिक १८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘एलआयसी’ने विक्री केलेल्या पॉलिसी आणि योजनांच्या संख्येतही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ मध्ये ही संख्या एकूण ७.८५ लाख होती. ती एप्रिल २०२४ अखेर ९.१२ टक्क्यांनी वाढून ८.५६ लाखांवर पोहोचली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने