Top News

Sugarcane Harvester Subsidy: ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेस मुदतवाढ; अनुदानाची रक्कम जमा न होऊ शकल्याने निर्णय !

 




हॅलो कृषी ऑनलाईनः राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी (Sugarcane Harvester Subsidy) यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च 2024 अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्प योजनेस (Sugarcane Harvester Subsidy) आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.



राष्ट्रीय कृषी विकास योजने (National Agricultural Development Scheme)

अंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान (Sugarcane Harvester Subsidy) देण्यास शासन

निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. 2023-24 या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजने

अंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान हा प्रकल्प राज्यात राबवण्याच्या दृष्टीकोनातून एकूण 900

ऊस तोड यंत्र (Sugarcane Harvester) खरेदी करण्यासाठी रू. 321.30 कोटी निधीच्या

कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

आता ऊस तोड यंत्र (Sugarcane Harvester Subsidy) खरेदी केल्यानंतर अर्जदाराची रक्कम त्यांच्या कर्ज खाती वर्ग करण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत प्रकल्पाचा कालावधी मार्च 2024 अखेर संपलेला असल्याने सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर दिनांक 11 जानेवारी 2024 अखेर राज्यातून वैयक्तिक शेतकरी (Farmer) उद्योजक, साखर कारखाने (Sugar Factory) यांचे कडून 9,136 अर्ज प्राप्त झाले आहेत



त्या अनुषंगाने अर्जदारांकडून ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester Subsidy) खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगती पथावर आहे. मात्र बँके मार्फत योजनेचे खाते PFMS प्रणालीस वेळेत मॅप न झाल्याने सदर अर्जदारांच्या कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षात प्रकल्पा अंतर्गत खर्च होऊ शकला नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पाचा दोन वर्षाचा कालावधी मार्च 2024 अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने