Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024: लाडकी बहीण, युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारची अजून एक भन्नाट योजना !!! महाराष्ट्र सरकारकडून 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे
महाराष्ट्रात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचाप्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रत्येकाला दर महिन्याला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.
राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येकाला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.
18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार – Eligibility Criteria For Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादुताची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे 50 हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कशी असणार निवड प्रक्रिया? Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Selection Process
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री योजनादूत” (Mukhyamantri Yojana Doot) कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झाली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
वयाची अट ४० पर्यंत करण्यात यावी अशी विनंती मी करत आहे.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा