Kisan Credit Card : चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्डच्या आधारे कृषी आणि संबंधित कामासाठी 3 लाख रुपयांचे अल्पकालावधीचे कर्ज देण्यात येते. त्यावरील व्याज सवलत योजना सुरु ठेवण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
सरकारने चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्ड(KCC) आधारे कृषी आणि संबंधित कामासाठी 3 लाख रुपयांचे अल्पकालावधीचे कर्ज देण्यास मंजुरी दिली.
हे कर्ज अल्पकालीन कालावधीसाठी असते. या योजनेत सवलतीच्या व्याजदरात म्हणजे 7 टक्के दराने कर्ज देण्यात येते.हे कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजााठी तीन टक्के वार्षिक अतिरिक्त आर्थिक मदत करते.म्हणजे या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना चार टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल. पण ते मुदतीत फेडण्याची अट शेतकऱ्यांना पाळावी लागेल.
कृषी कर्ज हे शेती, पशु पालन, दूध डेअरी, मत्स्य पालन, मधमाशी पालन यासाठी या कर्जाचा वापर करता येईल.किसान क्रेडिट कार्ड योजनेतंर्गत व्याज सवलतीचा फायदा पीक कापणीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असेल
टिप्पणी पोस्ट करा