Top News

NMMC CMYKPY Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिकेत लाडक्या भावांची भरती सुरू! फी नाही, लगेच अर्ज करा

 




NMMC CMYKPY Bharti 2024: लाडक्या भावांसाठी महाराष्ट्र शासनाने अजून एक आनंदाची बातमी दिली आहे, त्यानुसार आता लाडका भाऊ योजना मुंबईमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे.


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना अंतर्गत मुंबईमध्ये भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत. जो उमेदवार नोकरी करू इच्छित आहे त्यांना भरती साठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.



मुंबईमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, मुंबईच्या महानगरपालिकेत उमेदवारांना जॉब भेटणार आहे. एकूण रिक्त जागा 194 आहेत ज्या बारावी, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर उमेदवारांना सोडण्यात आल्या आहेत.


या भरतीसाठी नक्की कोणते उमेदवार पात्र असणार, अर्ज कसा करायचा, त्याची प्रक्रिया काय आहे, याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नोकरी मिळवायचे असेल तर फॉर्म भरून टाका.


पदाचे नाव विविध युवा प्रशिक्षण पदे

रिक्त जागा 194

नोकरीचे ठिकाण मुंबई

वेतन श्रेणी 10,000 रू. महिना

वयाची अट 18 ते 35 वर्षे

भरती फी फी नाही

NMMC CMYKPY Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या

विविध युवा प्रशिक्षण पदे 194

Total 194

NMMC CMYKPY Bharti 2024 Education Qualification

पदाचे नाव शिक्षण

विविध युवा प्रशिक्षण पदे 12वी/ ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी धारक उमेदवार

NMMC CMYKPY Bharti 2024 Salary Per Month

12वी पास Rs. 6,000/-

ITI उत्तीर्ण/ डिप्लोमा Rs. 8,000/-

पदवीधर Rs. 10,000/-

 



Important Links

जाहिरात PDF Download करा

भरतीचा फॉर्म Apply Online

अधिकृत वेबसाईट भेट द्या


NMMC CMYKPY Bharti 2024 Apply Online

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात सादर करायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात फॉर्म स्वीकारले जाणार नाही याची काळजी घ्या आणि जी अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे त्या प्रकारे फॉर्म भरा.


सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज करा या Apply Online Link वर क्लिक करायचे आहे.

तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम या पोर्टलवर पोहोचाल.

तिथे तुम्हाला Jobseeker म्हणून तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन करायचा आहे.

लॉगिन केल्यानंतर NMMC CMYKPY Bharti 2024 ची Apply Link शोधायची आहे.

त्यानंतर भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची.

आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे, डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्या.

या भरतीसाठी कोणत्या स्वरूपाची फी आकारले जाणार नाही, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार थेट अर्ज करू शकणार आहेत.

एकदा फॉर्म भरून झाला की नंतर तो तुम्हाला तपासायचा आहे, फॉर्ममध्ये टाकलेली सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करायची आहे.

एकदा खात्री पडली की नंतर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मुंबई भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

मुंबईमध्ये या भरतीचे शिबिर होणार आहे, शिबिरामध्ये पण उमेदवारांना त्यांची नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे.

NMMC CMYKPY Bharti 2024 Selection Process

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुंबई साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. बारावी, आयटीआय उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर अशा उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक मार्क नुसार निवडले जाणार आहे.


ज्या उमेदवारांना जास्त मार्क असतील त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे, मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची नाव येतील त्यांना जॉब प्रशिक्षणासाठी संधी दिली जाणार आहे.



या भरतीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सर्व तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण अनुभव देणे हा आहे. त्यामुळे सर्व अर्जदार उमेदवारांना जॉब भेटणार आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने