Top News

महत्त्वाची बातमी ! ई केवासी न केल्यास मिळणार नाहीत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मोफत गॅस सिलिंडर; 'या' दिवसापर्यंत मुदत; E-kyc कोठे करायची, वाचा...

 



सोलापूर : प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. प्रतिसिलिंडर ८३० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यात सध्या ८९ गॅस वितरक असून ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी गॅस वितरकांकडून करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.



मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी अगोदर स्वखर्चाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागेल त्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात त्याची रक्कम शासनाच्या गॅस कंपनीकडून वर्ग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री उज्वला योजनेचे एक लाख ६९ हजार ३४ लाभार्थी असून त्यांना केंद्र शासनाकडून ३०० रुपये तर राज्य सरकारकडून ५३० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी देखील पात्र आहेत.


जिल्ह्यात ५ लाख ८६ हजार ५०९ लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थीनी ई-केवायसी पूर्ण करणे अपेक्षित आहे. ई-केवायसी प्रक्रिया लाभार्थ्यांना आपल्या गॅस एजन्सीमार्फत करता येणार असून ते पूर्णपणे मोफत आहे. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाह जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.



ऑगस्टअखेर ई-केवायसीची मुदत

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थीना ई-केवायसीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा लागणार आहे. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी तशा सूचना केल्या आहेत. ई- केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीत जा ऑगस्टअखेर पूर्ण करून घ्यावी, अन्यथा लाभार्थ्यांना लाभ देण्यास अडचणी येतील, अन कळविण्यात आले आहे.

उज्वला योजनेच्या ई-केवायसीची सद्यः स्थिती

• प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी

• १,६९,०३४

• ई-केवायसी केलेले लाभार्थी

उज्वला योजनेच्या ई-केवायसीची सद्यः स्थिती

• प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी

• १,६९,०३४

• ई-केवायसी केलेले लाभार्थी

६८,३९६

• ई-केवायसी न केलेले लाभार्थी

• १,००,६३८

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने