Top News

Pune PMC Job Recruitment: मुलाखत द्या अन् नोकरी मिळवा! पुणे महापालिकेत नोकरीची मोठी संधी; निविदा जाहीर

 


पुणे- पुणे महापालिकेत काम करण्याची मोठी संधी चालून आली आहे. तरुणांना महापालिकेत नोकरीची संधी आहे. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 45 जागांसाठी थेट भरती केली जाणार आहे. नोकर भरतीसाठी महापालिकेकडून निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात.


महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ४५ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. विविध पदानुसार या भरतीप्रक्रियेच्या मुलाखती दिनांक 9 ऑगस्ट (आज), 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट रोजी होणार आहेत. थेट मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करू शकतात.


सध्या राज्यात नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. अशात पुणे महानरपालिकेकडून निविदा जाहीर करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही निविदा पाहू शकता. विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. यात परीक्षा होणार नसून थेट मुलाखत होणार आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रिक्त विविध पदांसाठी ही भरती होत आहे. मुलाखत ९, २३ आणि ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. या दिवशी तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. निवड झालेल्या उमेदवारांची यादी पुणे महापालिकेकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने