जेव्हा अचानक पैशाची गरज भासते. तेव्हा लोक सहसा वैयक्तिक कर्ज घेण्याच्या पर्यायाचा विचार करतात. वैयक्तिक कर्ज मिळणे सोपे आहे. अनेक वेळा बँका ग्राहकांना फोन करून वैयक्तिक कर्ज घेण्याबाबत बोलतात. अनेकदा लोक कर्ज घेताना काही चुका करतात. ज्यामुळे त्यांना नंतर अडचणींना सामोरे जावे लागते. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नंतर अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. याच पार्श्वभुमीवर आज आपण पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, याबाबत जाणून घेणार आहोत…
वैयक्तिक कर्ज हे महागडे कर्ज
वैयक्तिक कर्ज हे एक महागडे कर्ज आहे. त्याचा व्याजदर गोल्ड लोन आणि होम लोनपेक्षा खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही बँक किंवा एनबीएफसीकडून कर्ज घेण्यापूर्वी, त्याचे व्याजदर काळजीपूर्वक तपासून घ्यावे. अगदी एक टक्का व्याजदराचा फरक तुमच्या ईएमआयमध्ये मोठा फरक करू शकतो. कर्ज घेण्यापूर्वी सर्व बॅंकांच्या व्याजदरांची योग्य प्रकारे तुलना करा. वेगवेगळ्या बँका आणि एनबीएफसीचे दर ऑनलाईन तपासल्यानंतरच वैयक्तिक कर्ज घेण्याचा निर्णय घ्या.
कर्ज परतफेडीचा अवधी माहिती असावा
ज्या बँका किंवा एनबीएफसीकडून तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळते. त्यांच्याकडून वैयक्तिक कर्ज घ्यावे. तुमचे आधीच त्या बँकेत खाते असल्यास, तुम्हांला नवीन अर्ज भरण्याची गरज नाही आणि बँक तुमच्या क्रेडिट इतिहासाद्वारे तुमचे कर्ज सहजपणे मंजूर केले जाईल. कर्ज घेताना, तुम्ही बँक किंवा एनबीएफसीची परतफेड सुविधा तपासली पाहिजे. बँक तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी किती वेळ देत आहे. हे तुम्हाला माहीत असणे खुप आवश्यक आहे.
अल्प मुदतीच्या कर्जावर ईएमआय जास्त
कर्जाच्या कालावधीनुसार ईएमआय निश्चित केला जातो. अल्प मुदतीच्या कर्जावर ईएमआय जास्त आणि व्याज कमी असते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार परतफेडीची सुविधा निवडू शकतात. कर्ज घेत असताना, प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कांची माहिती घेणे देखील आवश्यक आहे. अनेक वेळा कर्ज घेताना ग्राहक हे लक्षात ठेवत नाहीत. यामुळे त्यांना नंतर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वरील सर्व बाबी लक्षात घेऊनच कर्ज घेण्याची प्रक्रिया पुर्ण करा.
टिप्पणी पोस्ट करा