नोकरदार व्यक्ती रिटायरमेंटनंतर निवांत आयुष्य जगावं व एक रेग्युलर इन्कम यावं यासाठी गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतात. अशा लोकांसाठी एक सरकारी योजना आहे, या योजनेचा व्याजदर बँकांपेक्षा जास्त आहे. या योजनेचं नाव पोस्ट ऑफिस सीनिअर सिटिझन स्कीम आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
रिटायरमेंटनंतर नियमित मासिक उत्पन्न मिळवणं सोपं नाही. पण जर तुम्ही काम करत असताना विचारपूर्वक गुंतवणूक केली तर ते शक्य होऊ शकतं. जर तुम्ही योग्य योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला रिटायरमेंटनंतरही मासिक उत्पन्न मिळू शकतं.
सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे. तुमच्या रिटायरमेंटसाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर यामध्ये तुम्ही पैसे जमा करू शकता. तुम्हाला दरमहा 20,000 रुपयांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर 8.2 टक्के व्याज मिळते.
सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम योजनेचा मॅच्युरिटी पीरियड पाच वर्षांचा आहे. या योजनेत 60 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक जमा पैसे जमा करू शकतो. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे, जी आधी 15 लाख रुपये होती.
तुम्ही सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये 30 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला दरवर्षी जवळपास 2,46,000 रुपये व्याज मिळेल. आता जर आपण हे पैसे मंथली कॅल्क्युलेट केले तर ते दर महिन्याला अंदाजे 20,500 रुपये होतात.
या योजनेअंतर्गत जे लोक स्वेच्छानिवृत्ती घेतात आणि ज्यांचे वय 55 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे ते देखील हे अकाउंट उघडू शकतात. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि गुंतवणूक करायची आहे, ते जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पैशावर टॅक्स भरावा लागतो. रिटायर झाल्यावर ज्यांना नियमित मासिक उत्पन्न हवे आहे, अशा लोकांसाठी सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय असू शकतो. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याआधी सर्व अटी आणि नियम समजून घ्या.
टिप्पणी पोस्ट करा