पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनांच्या नियमात बदल केला आहे. हे नियम १ ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. पाहा काय आहेत हे नियम.
पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आणि राष्ट्रीय लघु बचत (एनएसएस) संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू होतील. तुम्हीही जर यात गुंतवणूक केली असेल असेल तर हे नियम काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे.
पहिला नियम अल्पवयीन मुलांसाठी उघडण्यात आलेल्या पीपीएफ खात्याबाबत आहे. अल्पवयीन मुलांच्या नावानं उघडलेल्या पीपीएफ खात्यात वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दरानं व्याज मिळेल. त्यानंतर पीपीएफला लागू होणारा व्याजदर लागू होईल. त्यांच्या १८ व्या वाढदिवसापासून मॅच्युरिटीचं कॅलक्युलेशन केलं जाईल.
दुसरा नियम - जर एखाद्यानं एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील तर सध्याचा व्याजदर प्राथमिक खात्यावर लागू होईल आणि दुसरं खातं पहिल्या खात्यात विलीन केलं जाईल. अतिरिक्त रक्कम ० टक्के व्याजासह परत केली जाईल. दोन अतिरिक्त खाती उघडल्याच्या तारखेपासून ० टक्के व्याज मिळेल.
तिसरा नियम अनिवासी भारतीयांबाबत आहे. सक्रिय अनिवासी भारतीय ज्यांची पीपीएफ खाती 1968 अंतर्गत उघडली गेली होती, जिथे फॉर्म एच खातेदाराच्या रहिवासी स्थितीबद्दल विशेषपणे विचारत नाही. अशा खातेदारांना पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटवर (पीओएसए) ३० सप्टेंबरपर्यंत व्याज मिळेल. या तारखेनंतर व्याज ० टक्के होईल.
सुकन्या समृद्धी खातं - आजी-आजोबांनी सुकन्या समृद्धी खातं उघडलं तर ते खातं त्यांचे पालक किंवा बायोलॉजिकल पालकांकडे हस्तांतरित केलं जाईल. दोनपेक्षा जास्त खाती उघडली असतील तर अतिरिक्त खातं बंद केलं जाईल.
एनएसएसचा नवा नियम - २ एप्रिल १९९० पूर्वी उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये योजनेचा सध्याचा व्याजदर पहिल्या खात्यावर लागू राहील. दुसऱ्या खात्यातील शिल्लक रकमेवर सध्याचा पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट (POSA) दर आणि २ टक्के व्याज मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून दोन्ही खात्यावर ० टक्के व्याज मिळेल. २ एप्रिल १९९० नंतर उघडलेल्या खात्यांसाठी सध्याचा व्याजदर पहिल्या खात्यावर लागू होईल.
सध्याचा पोस्ट ऑफिस बचत खात्याचा दर दुसऱ्या खात्यावर लागू होईल. १ ऑक्टोबर २०२४ पासून दोन्ही खात्यावर ० टक्के व्याज मिळेल. दोनपेक्षा जास्त खाती असतील तर तिसऱ्या आणि अतिरिक्त खात्यावर कोणतंही व्याज मिळणार नाही. त्यातील मूळ रक्कम परत केली जाईल.
टिप्पणी पोस्ट करा