Top News

Soybean Subsidy: कापूस, सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी





 Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी १० सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या. पण पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ कायम आहे. ई-पीक पाहणीची अट कायम असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.



 २०२३ च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी करूनही सातबारावर सोयाबीन कापूस पिकांची नोंद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नाही, अशी तक्रार शेतकरी करत होते. 


या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषणा दरम्यान ई पीक पाहणी नोंदची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. 



त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली. परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणी अट कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने