मुंबई : गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा (Annapurna scheme) या तीन मोफत गॅस सिलिंडर योजनेचा (free LPG cylinders) लाभ दिला जाणार आहे
राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत.
त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलिंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा