Dainik Maval News : 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेची रक्कम न आलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडणी व सिडींग करण्यासह आपले बँक खाते सुरू असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मनिषा बिरारीस यांनी कळविले आहे.
दहा तारखेपर्यंत दोन्ही हफ्ते -
अजित पवार यांनी येत्या दहा ऑक्टोबरच्या आत लाडक्या बहीणींच्या खात्यात दोन महिन्याचे हफ्ते जमा होणार असल्याचे सांगितले. मावळमधील सभेत ते बोलत होते. शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना सुरू केली आहे. जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते दसरा दिवाळी सण लक्षात घेऊन १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील. असे अजित पवार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा