Top News

तुमच्या मुलींना शिष्यवृत्ती 3 हजार रुपये मिळाले का ? पहा ही खास योजना तुम्हाला कसा घेता येईल लाभ ? | Savitribai Phule Scholarship




  Savitribai Phule Scholarship : शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी योजना, समाजातील मागासवर्गीय, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टिकोनातून


पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 600 रुपयांपासून शिष्यवृत्ती देण्यात येते. कमी होते. पालक त्यांचे शिक्षण मध्येच बंद करत होते.



इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींचे शिक्षणाचे प्रमाण वाढून त्यांचाही विकास व्हावा, यासाठी समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेचा अनेकजणी लाभ घेत आहेत.


Savitribai Phule Scholarship

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती? : समाजातील मागासवर्गीय, इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना अर्थसहाय्य व्हावे यासाठी सावित्रीबाई फुले मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती सुरू केली आहे.



 

संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकंनी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींची 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या बैंक खात्यात ही रक्कम जमा केली जाते.


कागदपत्रे काय लागतात? :- शाळेत प्रवेश असल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी दस्तावेज जोडावे लागतात. ऑनलाइन अर्जासोबत पासपोर्ट फोटो, मुख्याध्यापकांचे संमतीपत्र लागते.


600 रूपयांपासून मिळते शिष्यवृत्ती : अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीं लाभार्थ्यांना दरमहा 60 रूपये या प्रमाणे दहा महिन्याचे 600 रुपये मिळतात. आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना हजार रूपये मिळत असतात. ही योजना विद्यार्थिनींसाठी लाभदायक ठरू लागली आहे.


योजनेचा लाभ घ्यावा : समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थीनीच्या शिष्यवृत्तीसाठी विविध योजना असून, त्याचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, अर्ज मुख्याध्यापकामार्फत सादर करावे. मनीष पवार : समाज कल्याण अधिकारी, धुळे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने