Top News

लखपती दीदी योजना

 



ही योजना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते सुरु करण्यात आली होती या योजनेचे नाव लखपती दीदी योजना असे आहे ही योजना राबविण्या मागचा उद्देश म्हणजे गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे आहे.


जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल, अर्ज कोठे करावा लागेल, कोणते कागदपत्रे आवश्यक असणर आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.


लखपती दीदी योजना योजना अंतर्गत ३ कोटी महिलांना लाभ देण्यात येणार आहे ज्यामध्ये पात्र लाभार्थ्याला १ लाख पासून ते 1 लाख ५० हजारांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ महिलांना बचत गटाच्या मदतीने देण्यात येणार आहे.


लखपती दीदी योजना ही ग्रामीण विकास मंत्रालय या विभागातर्फे राबविण्यात येते. ही योजना २०२३ मध्ये १५ ऑगस्ट ला आमलात आली होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे बघा खालीलप्रमाणे.


लखपती दीदी योजना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचा मोबाईल नंबर.


इमेल id.


पासपोर्ट साईज फोटो.


आधार कार्ड, पॅन कार्ड.


पासबुक.


वरील हे सर्व कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.


अर्ज करणाऱ्या महिला भारताच्या रहिवासी असाव्या.


अर्ज करण्यासाठी महिलांचे वय हे १८ वर्ष किंवा यापेक्षा जास्त असायला पाहिजे आणि ५० वर्ष किंवा यपेक्षा कमी असायला पाहिजे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कोठे करायचा बघा खालीलप्रमाणे.


असा करा अर्ज

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे आहे.


जिल्ह्याच्या ठिकणी एक महिला आणि बाल विकास या कार्यालयात जायचे आहे.


या कार्यालयात योजने संधर्भात चौकशी करायची आहे.


आता तुम्हाला या ठिकाणी अर्ज दिला तर हा अर्ज योग्य माहिती टाकून भरायचा आहे. जे कागदपत्रे वरीलप्रमाणे सांगिलते आहे ते अर्ज करताना आवश्य लागणार आहे.


या योजनेसाठी अद्यापही ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात आलेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांना offline पद्धातीनेच अर्ज सादर करावे लागणार आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने