PAN Card Update | तुम्हाला तर माहीतच आहे पॅन कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज आहे. सरकारी कामकाजा असो किंवा बँकेतील काम असो यासारख्या अनेक कामासाठी आपल्याला पॅन कार्ड ची गरज भासते. जर तुम्ही पॅन कार्ड बनवायचा विचार करत असाल तर ही गोष्ट माहित असणे गरजेचे आहे.
पॅन कार्ड बनवण्याचे वेळेस तुम्हाला महा सेवा केंद्र मध्ये बरेच अडचणीचा सामना करावा लागतो. पॅन कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडून जास्तीचे जबरदस्तीने पैसे घेतले जातात. परंतु आज आम्ही तुम्हाला घरी पॅन कार्ड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पॅन कार्ड बनवण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही.
पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत शिकून घ्यावी लागेल. पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कामकाज करावे लागते. यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही.
तसेच यासाठी तुम्हाला कोणतीही शुल्क भरावे लागणार नाहीत. हा ई-पॅन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ईमेलवर पॅन क्रमांक येणार आहे. तुम्ही हा पॅन क्रमांक कोणत्याही ठिकाणी सहज वापरू शकता. पण याची तुम्हाला प्रिंट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की मेलवर फक्त एकदाच ई- पॅन दिला जातो.
या प्रकारे करा अर्ज
तुम्हाला अर्ज करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील.
त्यामध्ये तुम्हाला ई पॅन ऑप्शन वरती क्लिक करावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला गेट न्यू पॅन दिसेल येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल.आणि भरण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल, त्यानंतर तुम्हाला मेल आणि मोबाईल नंबर एंटर करावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटांमध्ये तुमच्या ईमेलवर ई पॅन देण्यात येईल.
ही पॅन बनवण्याची अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे. या मदतीने तुमची अनेक कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतात. तसेच यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज देखील भासणार नाही.
तसेच या पॅन बनवण्यासाठी जास्तीत जास्त दिवसांचा कालावधी लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते, तसेच आजच्या डिजिटल युगात वापरात येणारा ही अतिशय सोपी पद्धत आहे.
टिप्पणी पोस्ट करा