Top News

अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर पहा जिल्हा व कोणाला मिळेल हा विमा ? ! Crop Insurance Amount

 



Crop Insurance Amount : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा चा दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आज जाणून घेऊया. कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना


पिक विम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे ? या संदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अशी माहिती दिलेली आहे. आपल्या माहिती यांना मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे



शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून 50% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या महसूल मंडळामध्ये 25% हा ग्रॅम विमा हा मंजूर करण्यात आला आहे.


Crop Insurance Amount

मंजूर केल्यानंतर 25% अग्रीम पिक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार उर्वरित पीक विमा वाटप करण्यात येणार आहे


अशी माहिती राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात विमा न मिळालेल्या बीड

जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना एकूण अग्रीमचा 76 कोटी 27 लाख रुपये चा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.



थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यास सुरू झाला आहे. परंतु हा सर्वात महत्त्वाचा जर जिल्हा पाहायला गेलं तर हा जिल्हा आहे,

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या त्याची जी काही रक्कम आहे. पिक विम्याची जमा होण्यास सुरुवात झाली आहे.


या अगोदर पहिल्या टप्प्यांमध्ये जिल्ह्यात 241 कोटींचं वितरण 99% पूर्ण झाले अशी माहिती राज्य कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकृत त्यांच्या ट्विटर हँडलवरून म्हणजेच X वरून दिलेली आहे.

त्याचा स्क्रीन शॉट तुम्हाला देखील खाली देण्यात आलेला आहे. तुम्हाला ही पिक विमा मिळाला का नसेल तर बीड जिल्ह्यातील तुम्ही असाल आणि तुम्हाला विमा नसेल तर तुम्हाला देखील हा आता विमा मिळू शकतो.

आता पिक विमा तुम्हाला मिळेल किंवा नाही याची माहिती तुम्हाला जर तुमच्या स्टेटस चेक करायचा असेल. तर तुम्ही pmfby या वेबसाईटला विजिट करून त्या ठिकाणी लॉगिन करून माहिती मिळवू शकता धन्यवाद….

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने