सातारा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण जागा भरण्यात (MSRTC Satara Recruitment 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार समुपदेशक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५ ००१ या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावेत.
MSRTC Satara Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | मान्यताप्राप्त विदयापिठाची / संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी M.S.W. किंवा मान्यताप्राप्त विदयापिठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवीच (M.A.Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका Advance Diploma in psychology |
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – MSRTC Satara Job 2024
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
टिप्पणी पोस्ट करा